पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. यानंतर पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भाषणावर नाराजी व्यक्त केली होती. मोरेंनी आपण बेचैन असल्याचे सांगितले.
ठाकरेंच्या या भाषणावर प्रभागातील काही मुस्लीम मतदार भयग्रस्त झाले आहेत, तसेच एका शाखाप्रमुखाने राजीनामा दिला असल्याचे अशी माहितीही वसंत मोरेंनी जाहीर केली. एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पुण्यातील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे दिसत आहेत.
यावरून वसंत मोरे म्हणाले, “मी शहराध्यक्ष असलो तरी एक लोकप्रतिनिधी आहे, माझ्या प्रभागातील मुस्लिम मतदार नाराज होत असतील, भयग्रस्त होत असतील तर मला त्याची काळजी करायलाच हवी. राज ठाकरेंवर नाराज नाही, मात्र बेचैन आहे, प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन यावर बोलेन” असेही मोरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
नगरसेवक वसंत मोरेंचा मनसेला रामराम? पक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट!
IPL 2022 : सूर्य कुणीकडं उगवला..! दीपक हुडानं कृणाल पंड्याला म्हटलं ‘भाऊ’; वाचा सविस्तर!
“पैसे योग्य ठिकाणी गुजरातला तर…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर निशाणा
“मातृभूमीचा लिलाव करून बाजार मांडणारे महात्मा किरीट सोमय्या”; राऊतांचा टोला
वसंत मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेत नाराजीनाट्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

