उस्मानाबाद: कोरोनाचा कहर सध्या जिह्यात वाढत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर लाॅकडाऊन उठविण्यात आले. सर्वकाही सुरळीत हाेत असतानाच दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अत्यंत तीव्र स्वरूपाची आहे. असेल? असतानाही पूर्वीप्रमाणे काटेकाेर उपाययाेजना राबविल्या जाताना दिसत नाही. एकीकडे कडक लाॅकडाऊन लागू असताना दुसरीकडे रूग्णांची काॅन्टॅक्ट हिस्ट्री तपासणीवर अधिक भर दिला गेला हाेता. गावात वा एखाद्या वाॅर्डात रूग्ण आढळून आल्यानंतर संपर्कातील सर्वांचा शाेध घेऊन टेस्ट केल्या जात हाेत्या.
रिपाेर्ट निगेटिव्ह आला तरी किमान दहा ते पंधरा दिव क्वारंटाईन केले जात हाेते. काेराेना स्प्रेडरची अशा पद्धतीने नाकाबंदी केल्यामुळे इतर लाेक त्यांच्या संपर्कात येत नसत. एवढेच नाही तर घरामध्ये क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींच्या हातावर ‘हाेम क्वारंटाईन’चा शिक्का मारला जात हाेता. त्यामुळे असेल? व्यक्ती बाहेर फिरत असल्यास आजूबाजुचे लाेक तातडीने प्रशासनाला कळवित हाेते. मात्र, आता अशा उपायाेजना फारशा हाेताना दिसत नाही. त्रास हाेऊ लागल्यानंतर लाेक स्वताच्या कारसह रिक्षा वा खाजगी जीपने केंद्रावर येत आहेत.
टेस्ट पाॅझिटीव्ह आल्यानंतरही सदरील मंडळी अशाच वाहनांतून आपल्या घराचा वा काेविड सेंटरचा रस्ता धरतात. परिणामी ही मंडळीही काेराेना सुपर स्प्रेडर ठरत आहे. यांच्या संपर्कातील व्यक्तींचा साधा शाेधही घेतला जात नाही. त्यामुळे जाेपर्यंत काही तरी त्रास हाेत नाही ताेवर संबंधित व्यक्ती तपासणी केंद्राकडे फिरकतही नाही. याचा अनुभवही जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे सावरतंय ! सलग पाचव्या दिवशी कोरोनमुक्तांची संख्या अधिक, आता ‘ढिलाई’ नकोच
- कोरोना बाधितांनी घरीच उपचार घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
- आजच्या सामन्यात कृणाल पांड्या दीपक हुडाच्या निशानावर; त्या अपमानाचा बदला घेण्याची शक्यता
- वेळीच काँग्रेस नेत्यांचे सल्ले ऐकले असते तर देशाचे स्मशान झाले नसते – पटोले
- कोरोनाच्या तणावात प्रशासनाचे जलपर्णीकडे दुर्लक्ष; इतर आजारांना मिळतंय खुलं निमंत्रण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

