Share

औरंगाबादेत व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची टंचाई, मात्र ५०० ऑक्सिजन बेड रिकामे!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत औरंगाबाद शहरात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे गंभीर रुग्ण वाढल्याने रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड शिल्लक नाहीत. मात्र ऑक्सिजनची टंचाई नसून विविध रुग्णालयातील ५०० बेड रिकामे असल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी गुरूवारी (दि.२२) सांगितले.

तसेच पालिकेच्या कोविड केअर सेंटर्सध्ये देखील दोन हजार बेड्स रिकामे असल्याचे त्यांनी नमूद केले. आयुक्त पांडेय यांनी माध्यमांना सांगितले की, राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असला तरी शहरात मात्र ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होत आहे. शहरातील ७० रुग्णालयात रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड आहेत. त्याकरिता दररोज ५६.७ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मागणी आणि पुरवठा सारखाच असल्यामुळे ऑक्सिजन रुग्णांना मिळत आहे.

कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई नाही. सरकारी आणि खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचे ऑडिट करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शहराची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्यासाठी एक पथक स्थापन केले असून या पथकाने कामाला सुरूवात केली आहे. पथकाकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयनिहाय ऑक्सिजनचे ऑडिट केले जाणार आहे.

शहरातील रुग्णालयांना सहा ते सात एजन्सीव्दारे ऑक्सिजन पुरविला जात आहे. सध्या रुग्णसंख्या झपाटयाने कमी होत चालली आहे. कोविड केअर सेंटरमधील ३५०० बेडपैकी १७०० बेड रिकामे आहेत. त्यासोबतच ऑक्सिजन सुमारे ५०० बेड रिकामे असून ऑक्सिजनअभावी रुग्ण गंभीर बनल्याची घटना घडलेली नाही, असेही प्रशासक पांडेय यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!