🕒 1 min read
मुंबई : कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणी भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर संशयाची टांगती तलवार असून २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्यांची अर्धा तास चौकशी केली. आता नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी आज(२८ डिसें.)दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक(Vaibhav Naik) यांनी नितेश राणेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद असतांना वैभव नाईक म्हणाले की,’सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या १८ डिसें. ला संतोष परब यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला झाला. त्या फिर्यादीमध्ये नितेश राणेंच्या नावाने धमकी देण्यात आल्याचे लिहिलेलं होत. आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु करतांना याप्रकरणी ज्या सातपुतेला अटक केली आहे. तो नितेश राणेंच्या सोबतचा कार्यकर्ता आहे. त्याला दिल्लीवरून अटक करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कोणत्या मंत्र्यांकडून अटक झाली हे अजून पोलिसांनी सांगितलेले नाही. परंतु, त्याला अटक केल्यानंतर नितेश राणेंचे नाव समोर आले आहे’, असे नाईक म्हणाले.
दरम्यान पुढे ते म्हणाले की,’नारायण राणे हे अनेकवेळा लोकांना आवाहन देत असतात परंतु आपल्या मुलाला अटक होऊ नये यासाठी ते आपल्या मुलाला लपवून बसले आहेत. खरं तर त्यांच्यामध्ये काही दोष नसेल तर त्यांनी आपल्या मुलाला पोलिसांसमोर हजर केले पाहिजे. तसेच पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेले पाहिजे आणि जर ते गुन्हेगार नसतील तर पोलीस त्यांना अटक करणार नाहीत. परंतु आपण केलेल्या गुन्ह्याची भीती असल्यामुळेच ते लपत आहेत. तसेच ‘बाबा मला वाचव’ असे म्हणत नितेश राणे बाबांच्या पडद्याआड बसले आहेत आणि तिथून ते लोकांना धमकावण्याची कारवाई करताय. त्यामुळे निश्चितपणे सरकारने आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करायला हवी. तसेच त्यांच्यामुळे कोणताही दबाव यायला नको,अशी आमची मागणी आहे. तसेच मला खात्री आहे की, ज्याप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली होती त्याच प्रमाणे जर दोषी असतील तर आमदारांनाही अटक होईल.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये- संजय राऊत
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल


