Share

छोटया पडद्यावरील ‘वहिणीसाहेब’ झळकणार दुर्गामातेची भूमिकेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छोटया पडद्यावरील लोकप्रिय झालेली ”तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना आपलसं केलं. मात्र त्यातील ‘वहिणीसाहेब’ ही भूमिका अत्यंत गाजली होती. याच मालिकेतील ही कलाकार आता वेगळया भूमिकेत दिसणार आहे.

चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रमातून  नवरात्री विशेष भागात ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री धनश्री काडगांवकर दिसणार आहे. धनश्रीने या आधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिची वहिनीसाहेब ही भूमिका विशेष गाजली होती. मात्र ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, ‘माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. मात्र ‘घेतला वसा टाकू नको ‘असं मी माझ्या मनाशी पक्क करून ही भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.’असं तिचं म्हणणं आहे. अभिनेत्री धनश्री काडगांवकर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चाहत्यांमध्ये तिचा अभिनय बघण्याची उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!