🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले होते. तर, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने तीव्र आंदोलने केली होती. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी देखील आंदोलनांमध्ये सहभाग घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता.
आता गणेशोत्सव काळानंतर देखील कोरोना स्थिती आटोक्यात असल्याने राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात शाळा, महाविद्यालये, मंदिरे, चित्रपटगृह, नाट्यगृह हे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु झाल्या असून आता मंदिरे आणि सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी खुली केली जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर घटस्थापनेला राज्यभर आनंदोत्सव साजरा करत देवाच्या दर्शनाला जाणार असल्याची घोषणा भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या देवी-देवतांना कडी कुलुपात बंद करुन ठेवले होते. पण आमच्या संघर्षामुळे या महिषासुर सरकारला आम्ही वठणीवर आणले. आणि आता घटस्थापनेला मंदिराचे टाळे उघडणार आहेत. हा दिवस आम्ही आनंदाने साजरा करणार आहोत. राज्यभरातील सर्व मंदिरामध्ये आमचे कार्यकर्ते ढोल ताशा,घंटा,शंख वाजवत, गुलाल उधळण करत देवाच्या दर्शनाला जातील. आम्ही देवाला प्रार्थना करु की या अधर्मी सरकारला बुद्धी द्या ! असा घणाघात भोसले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कितीही नौटंकी केली तरी..’ निलेश राणेंचा प्रियांका गांधींना खोचक टोला
- ‘देशासाठी मोठा त्याग करणाऱ्या कुटुंबातील प्रियंकांचा गुन्हा काय?’
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
