🕒 1 min read
मुंबई : अलीकडचे साधू हे मनोरुग्ण आहेत, व साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाही; असं धक्कादायक वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष असणारे आचार्य तुषार भोसले यांच्यावर देखील वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली होती. यामुळे संतप्त झालेल्या तुषार भोसले यांनी मंत्री विजय वडेट्टीवारांवर सडकून टीका केलेली आहे.
जर का विजय वडेट्टीवारांनी त्याचं वक्तव्य मागे घेवून, त्यांनी साधू-संतांची माफी नाही मागितली तर त्यांना अतिशय वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. असा इशारा आचार्य तुषार भोसले यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिला आहे.
“महाविकास आघाडी मध्ये महिलांवर अत्याचार करणारे मंत्री आहेतच पण विजय वडेट्टीवार यांसारखे मनोरुग्ण मंत्री सुध्या आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्री असणारे वडेट्टीवार ‘साधू मनोरुग्ण आहेत, साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत’ अशा प्रकारच वक्तव्य करतात हे महाराष्ट्रच दुदैव आहे.
तुकाराम महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदू धर्माच्या पवित्र साधू परंपरेवर टीका होते, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निमुटपणे सत्तेच्या हव्यासापोटी मौन धारण करतात. महाराष्ट्राला हे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का ? सोनिया गांधी यांचा हिंदू धर्म विरोधी अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का ?” असा संतप्त सवाल भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र देशा इम्पॅक्ट : अखेर शिवजयंतीच्या निर्बंधांवरुन राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं
- ‘काहीही लिहू नका, तिला स्वर्गात शांतपणे राहू द्या’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- आंदोलनासाठी दीर्घकाळ सार्वजनिक जागेचा ताबा घेणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाने आंदोलकांना सुनावले खडेबोल
- ‘शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का’?
- फेसबुक करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण स्मार्टवॉच बाजारात आणण्याची तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
