🕒 1 min read
नवी दिल्ली : अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी फोन, टॅब्लेट ते फिटनेस बँड या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. तर आता ऍपल वाहन क्षेत्रात प्रवेश करत आहे ऍपल 2024 पर्यंत कारचे उत्पादन सुरू करू शकते. ही प्रवासी कार त्याच्या स्वत: च्या प्रगत बॅटरी तंत्रज्ञानावर आधारित असेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ऍपल कंपनी नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा होती. ती आता खरी ठरली आहे.
आता ऍपलच्या वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच येत आहे. समाज माध्यमांमध्ये वर्चस्व निर्माण करणाऱ्या फेसबुकने आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे संकेत दिले आहेत. सध्या फेसबुककडून हटके स्वरुपाच्या स्मार्टवॉचवर काम केले जात आहे. हे स्मार्टवॉच युजर्सला मेसेज पाठवण्याबरोबरच हेल्थ आणि फिटनेस फिचर्स ऑफर करणार आहे. हे स्मार्टवॉच ऍपलआणि हुवावेला कडवी टक्कर देणार आहे. सध्या मार्केटमध्ये ऍपल आणिा हुवावेच्या वॉचची छाप आहे. फेसबुकने आपले स्मार्टवॉच पुढील वर्षीच बाजारात आणण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
फेसबुकचे स्मार्टवॉच सेल्युलर कनेक्शनवर काम करेल. हे स्मार्टवॉच युजर्सला मेसेज पाठवण्याबरोबरच इतर सेवा तसेच हेल्थ आणि फिटनेस कंपनीच्या अन्य हार्डवेअरशी कनेक्ट करण्याची संधी देणार आहे. यात पेलोटॉन इंटर ऍक्टिव आदींचा समावेश आहे. फेसबुकने अलिकडेच हार्डवेअर क्षेत्रात एण्ट्री केली आहे. यात व्हर्चुअल रिऍलिटी हेडसेट ओकुलस, व्हिडीओ चॅटिंग डिव्हाईस पोर्टलसह काही प्रोडक्ट्सचा समावेश आहे.
फेसबुकचे स्मार्टवॉच गुगल ऍण्ड्रॉईड सॉफ्टवेअरच्या ओपन सोर्स व्हर्जनवर काम करेल. कंपनी या वॉचच्या पहिल्या जनरेशनला 2022 मध्ये लॉन्च करू शकते, तर दुसरे जनरेशन 2023 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. याशिवाय फेसबुक आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा तयार करीत आहे. वॉचच्या किंमतीबाबत अजून काही माहिती पुढे आलेली नाही. कंपनी हे स्मार्टवॉच प्रोडक्शन कॉस्ट म्हणजेच उत्पादनाचा खर्चाइतकीच किंमत ठेवून विक्री करू शकते, या स्मार्टवॉचमध्ये युजर्स आपले वर्कआऊट मित्रासोबत शेअर करू शकतो, अशा प्रकारचे काही फिचर्स ऍन्ड करण्याचीही फेसबुकची योजना आहे. यामुळे तुम्ही आपल्या ट्रेनरशी थेट संपर्क साधू शकता. हे फिचर स्ट्रेव्हा ऍपलप्रमाणे असेल, जे रनर्स आणि सायकलिस्टला आपला वर्कआऊट ट्रॅक करण्याची व कंपेअर करण्याची संधी देते. फेसबुकडून लवकरच स्मार्टवॉचबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार हे दिलदार राजकारणी, सुशीलकुमार शिंदेंनी उधळली स्तुतिसुमने
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- गडकरीची औरंगाबादकरासाठी मोठी घोषणा; औरंगाबाद-पुणे महामार्ग होणार डायरेक्ट अॅक्सेस
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
