Share

‘काहीही लिहू नका, तिला स्वर्गात शांतपणे राहू द्या’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन

Published On: 

औरंगाबाद : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये अद्याप तिच्या कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पूजाची लहानी बहीण दिया चव्हाणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात पूजाने तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल, असे म्हटले आहे. शिवाय काही जण सोशल मीडियावर काहीही पोस्ट टाकत आहे. त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे. त्यामुळे कृपया काहीही लिहू नका, तिला शांतपणे जगू द्या, असे आवाहन पूजाची बहिण दिया हिने इन्स्टाग्रामवरून केले आहे.दियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट असली तरी ती पोस्ट तिनेच टाकली का? याबाबत पडताळणीसाठी तिच्याशी किंवा तिच्या कुटुंबाशी अद्याप कुठ लाही संपर्क झाला नाही.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र यानंतरही कुटुंबातला कुठलाही व्यक्ती या प्रकरणावर बोलायला तयार नव्हता.

आता या प्रकरणाला वेगळं वळण आलं असून कालपर्यंत तिच्या घरातून कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त होत नव्हत्या. परंतु पूजाची छोटी बहीण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तिने माझी बहिण वाघिण होती, ती असे करु शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये कुठलं तरी मोठं कारण असेल, असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!