🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. राज्यभरात विविध उपक्रमांसह मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात ही शिवजयंती साजरी केली जाते. फक्त देशात वा राज्यातच नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती प्रदेशात देखील उत्साहात साजरी केली जाते.
मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच शिवभक्तांकडून आयोजनाची तयारी करण्यात आली होती मात्र ऐनवेळी गृहविभागानं आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
‘महाराष्ट्र देशा’ने यासंदर्भात सर्वप्रथम आवाज उठवला होता. आम्ही सध्या सुरु असलेले विविध राजकीय पक्षांचे मळावे,सभा,पार्ट्या,मिरवणुका याबाबतचे वास्तव बातमीच्या माध्यमातून मांडले होते.आम्हीच सर्वप्रथम शासनाचे दुट्टपी वागणे जनतेसमोर पुरावे आणि तर्कांसह मांडले होते.विविध पक्षांचे नेते महाराष्ट्रभर शेकडो लोक घेऊन फिरतात, कार्यक्रम घेतात त्यांना मात्र पोलिस परवानगी देत असताना सरकार शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालत असल्याचे आम्ही जनतेच्या निदर्शनास आणून दिले. आम्ही या अन्यायकारक निर्णयाबाबत आवाज बुलंद केल्यावर भाजप, मनसेसह राज्यातील शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यानंतर आता राज्य सरकारला एक पाऊल मागे घेतलं आहे. सरकारने नवी नयमावली जाहीर केली असून शिवजयंतीला आता १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. याबाबत राज्य शासनाच्या गृहविभागाने नवीन परिपत्रक जारी केलं आहे. १०० लोकांच्या उपस्थितीला परवानगगी देण्यात आली असली तरी इतर निर्बंध मात्र राज्य सरकारने कायम ठेवले आहेत.
दरम्यान,राजकीय पक्षांना वेगळे नियम आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगळे नियम राज्यात आहेत कि काय असा सवाल आजही उपस्थित होत आहे. राज्यात आता प्रार्थनास्थळे,हॉटेल्स, शाळा,पब,बार,रेल्वे,सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरु करण्यात आली असताना कोरोनाचे नियम खरेच पाळले जात आहेत का हा वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल मात्र फक्त शिवजयंतीवर निर्बंध घालून सरकार नेमकं काय सिद्ध करू इच्छिते हा महत्वाचा प्रश्न अजूनही उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार हे दिलदार राजकारणी, सुशीलकुमार शिंदेंनी उधळली स्तुतिसुमने
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- गडकरीची औरंगाबादकरासाठी मोठी घोषणा; औरंगाबाद-पुणे महामार्ग होणार डायरेक्ट अॅक्सेस
- आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे
- विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा, आरोपी फरार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
