🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीपुढे बुधवारी सीरमच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यापैकी ‘सीरम इन्स्टिटय़ूट’च्या लशीला शुक्रवारी तज्ज्ञ समितीने मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार भारताच्या महाऔषध नियंत्रकांनी लशीच्या वापरास अंतिम परवानगी दिल्यानंतर लसीकरण मोहीम सुरू होऊ शकेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
या समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली. त्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांनी त्यांच्या लशींच्या आपत्कालीन वापराबाबत केलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून मिळालेला सुरक्षितता, परिणामकारकता आणि रोगप्रतिबंधात्मक माहितीचा तपशील सादर करावा अशा विविध नियामक अटी या समितीनं सिरम इन्स्टिट्यूटला घातल्या आहेत. याबाबत अंतिम निर्णय औषध महानियंत्रक घेणार आहेत.
I am not going to get vaccinated for now. How can I trust BJP's vaccine, when our government will be formed everyone will get free vaccine. We cannot take BJP's vaccine: Samajwadi Party chief Akhilesh Yadav#COVID19 pic.twitter.com/qnmGENzUBH
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 2, 2021
दरम्यान, एका बाजूला या लसीच्या बाबतीत जय्यत तयारी सुरु असताना आता या लसीच्या बाबतीत देखील राजकारण होऊ लागले आहे. मी लसीकरण करवून घेणार नाही. भाजप सरकार कडून देण्यात येत असलेल्या लसीवर मी कसा विश्वास ठेवू ? असा सवाल समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांना मोफत लस देवू असे आश्वासन देखील यादव यांनी दिले आहे.
काय म्हणणार अशा माणसांना जे औषधांमध्ये पण पक्ष शोधतात. प्रत्येक आजारावर वॅक्सिंग येईल पण आजारी मानसिकतेवर कधीच औषध येणार नाही आणि जोपर्यंत ही आजारी मानसिकता भारतातून जात नाही तो पर्यंत आपल्या देशाचा काय खरं नाही. https://t.co/G9j4jaAlNL
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 2, 2021
दरम्यान, भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी अखिलेश यादव यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. काय म्हणणार अशा माणसांना जे औषधांमध्ये पण पक्ष शोधतात. प्रत्येक आजारावर वॅक्सीन येईल पण आजारी मानसिकतेवर कधीच औषध येणार नाही आणि जोपर्यंत ही आजारी मानसिकता भारतातून जात नाही तो पर्यंत आपल्या देशाचा काय खरं नाही असं म्हणत राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सकाळी मोफत कोरोना लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी
- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पहाणी
- ‘त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यातचं घुसला…’
- चाहत्याने भरलं रोहित, गिल आणि पंत यांच्या जेवणाचं चक्क ‘इतकं’ बिल
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
