Share

सकाळी मोफत कोरोना लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली:- देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा काही वेळापूर्वी केली होती. दरम्यान, जनतेला कोरोनाची मोफत लस देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अवघ्या अर्ध्या तासातच घुमजाव केलं आहे. काही ठरावीक लोकांनाच कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याचं ट्विट डॉ. हर्षवर्धन यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

डॉ.हर्षवर्धन आज सकाळी गुरु तेग बहादूर सिंग रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना कोरोनाची लस दिल्लीतील जनतेलाच मोफत मिळणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण भारतातील जनतेला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस किती टप्प्यात वितरीत केली जाईल याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत दिली जाईल. त्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि दोन कोटी फ्रंटलाईन वर्करचा समावेश असेल. प्राथमिकता यादीतील इतर 27 कोटी लोकांना जुलैपर्यंत लस देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाची लस आल्या आल्या सामान्य लोकांना ही लस मोफत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!