औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीसाठी शहरात नागरिकांची धावाधाव सुरूच आहे. सोमवारी (दि.१९) लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद राहणार आहे. मात्र कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी वेटींग तब्बल ४० हजारांच्या पुढे गेली आहे. अनेकांचे शासनाने ठरवून दिलेले ८४ दिवस कधीच संपले असून, दररोज चौकशी करूनही त्यांना डोस मिळत नसल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर पहिल्या डोससाठी देखील नागरिकांची ओरड सुरू आहेत. महापालिका प्रशासनाचे मात्र केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या लसींच्या साठ्याकडे डोळे लागले आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत पण दुसरीकडे लसींचे मुबलक प्रमाणात डोस मिळत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. महापालिकेने आत्तापर्यंत पाच लाख २३ हजार एवढा लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला असला तरी त्यात दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र केवळ सव्वा लाखांच्या घरात आहे. आठवडाभरासाठी किमान एक लाख डोस मिळाव्यात अशी माहापालिकेची मागणी आहे.
मात्र त्या तुलनेत १० ते १५ हजार लसी दिल्या जात आहेत. महापालिकेने दररोज १५ ते २० हजार लसीकरण करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. पण लसींचा साठा नसल्याने लसीकरणात वारंवार व्यत्यय येत आहे. १८ वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र शासनाकडून वेळेवर पुरवठा होत नसल्याने दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पाच ते दहा हजारांच्या पुरवठ्यात ४० हजार नागरिकांना दुसरा डोस कसा देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पेगासस प्रकरण : ‘अधिवेशनाच्या आदल्या दिवशी असे अहवाल प्रकाशित होणे हा योगायोग नाही’
- ८२ एक्सप्रेस, पॅसेंजरसहीत नांदेड रोटेगाव डेमू रुळावर, प्रवाशांकडून स्वागत!
- ‘ठाकरे सरकारमध्ये नेते कमी अन् बोलके पोपटच जास्त’, ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा टोला
- ‘वाकला – चांदेश्वर जलप्रकल्प जलसंपदा विभागाला पुर्ण करण्याचे आदेश जारी’
- चित्रा वाघ यांनी केले संजय राऊतांचे कौतुक, म्हणाल्या… त्यासाठी केंद्राला जबाबदार धरले नाही!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
