औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने फक्त आरक्षीत रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसत आहे. मात्र आता दक्षिण मध्य रेल्वेने ८२ एक्सप्रेस, पॅसेंजर विशेष रेल्वे सुरू केली आहे. या निर्णयातंर्गत औरंगाबाद मार्गावर नांदेड रोटेगाव डेमू सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड विभागात तीन डेमू चालविण्यात येणार आहे. सामान्य प्रवाशांसाठी नांदेड विभागाकडून तीन विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही रेल्वे अनारक्षित प्रवासासाठी असतील.
नांदेड रोटेगाव डेमू ही १९ जुलैपासून नांदेड रेल्वे स्टेशनहून रोज सायंकाळी ७:२५ निघणार आहे. ही रेल्वे औरंगाबादला मध्यरात्री १:३० वाजेच्या दरम्यान पोहोचणार आहे. पहाटे ३ वाजता रोटेगाव रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे पोहोचेल. रोटेगाव ते नांदेड ही रेल्वे १९ जुलै रोजी रोटेगांव येथून सकाळी ७ वाजेच्या दरम्यान निघेल. ही रेल्वे सकाळी साडेआठ वाजता औरंगाबादला पोहोचणार आहे. तर नांदेडला ही रेल्वे दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पोहोचेल.
तसेच अकोला ते पूर्णा ही विशेष डेमू रेल्वे १९ जुलैपासून अकोला येथून रोज दुपारी ४ वाजेच्या दरम्यान निघणार आहे. ही रेल्वे पुर्णाला रात्री ९ वाजता पोहोचणार आहे. तसेच पूर्णा ते अकोला ही डेमू रेल्वे पुर्णाहून सकाळी ८ वाजता निघणार आहे. ही रेल्वे अकोला येथे दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पोहचेल. परळी ते आदिलाबाद ही विशेष डेमू रेल्वे २१ जुलैपासून परळी येथून रोज दुपारी निघेल. आदिलाबाद येथे ही रेल्वे रात्री पावणेबारावाजेच्या दरम्यान पोहोचणार आहे. आदिलाबाद ते परळी ही रेल्वे आदिलाबाद येथून सकाळी साडेतीन वाजता निघणार आहे. ही रेल्वे दुपारी १२ वाजता परळी येथे पोहचेल.
महत्त्वाच्या बातम्या
- अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज त्वरीत वितरीत करा – जेम्स अंबिलढगे
- ‘देशमुखांचे वय झालेय, त्यांना आता लपाछपीचा खेळ झेपणार नाही’, अतुल भातखळरांचा टोला
- पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला पोलिस कोठडी
- बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आमदार नमिता मुंदडा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, पंचनामे करण्याची मागणी
- स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्री निघाले पंढरीला ; पहाटे करणार शासकीय महापूजा

