Share

भारतात लवकरच लसीकरणाला सुरुवात; आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत

Published On: 

नवी दिल्ली :  गेल्या वर्ष भरापासून जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घटल असून अनेकांचे या आजाराने बळी गेले आहेत. राज्यासह देशात देखील कोरोनाने कहर माजवला आहे. सध्या कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. काही दिवसांपासून कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त हाती येत असून नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह हैद्राबाद व अहमदाबादमधील लस संशोधन करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली होती. भारतीयांसाठी लवकरच करोना प्रतिबंध लस देण्याची मोहिम सुरु होण्याची शक्यता आहे. कारण त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून त्यानुसार देशातील ३० कोटी जनतेला लस देण्यात येईल. यामध्ये आरोग्य कर्मचारी, करोना काळात लढणारे आघाडीचे कर्मचारी जसे पोलीस, सैन्य आणि स्वच्छता कर्मचारी, ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती तसेच ५० वयापेक्षा कमी असलेल्या पण विशिष्ट आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती या लोकांचा या प्राधान्यक्रमामध्ये समावेश असेल.”

आमचा प्रयत्न आहे की, आमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीतील प्रत्येकाला करोना प्रतिबंध लस मिळावी. लसीच्या अनिश्चिततेबाबत निर्माण झालेल्या अडचणीबाबत आम्ही माहिती देत राहू. पण जर एखाद्याने ठरवलं की त्याला लस नको आहे तर आम्ही त्याला जबरदस्ती करु शकत नाही, असंही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं. पोलिओचे निर्मूलन करणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य होते. त्याप्रमाणेच शेवटी करोनाचा संसर्ग देखील कमी होईल आणि हा आजारही साधारण होऊन जाईल, असा विश्वासही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!