Share

औरंगाबादेतील महाविद्यालयात लसीकरणाला सुरुवात; नोंदणीसाठी विद्यार्थ्यांची लगबग

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कवच कुंडल यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. याच धर्तीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २१ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १८ वर्षांवरील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करुन घेण्यासाठी मिशन युवा स्वास्थ राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आजपासून शहरातील विवेकानंद आणि एमपी लॉ कॉलेज या दोन महाविद्यालयात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दोन्ही महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील सर्व शासकीय निमशासकीय व खाजगी महाविद्यालय २० ऑक्टोबर पासून सुरू झाली आहेत. या महाविद्यालयातील १८ वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण पहिला व दुसरा डोस पूर्ण करून घेण्यासाठी २५ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान मिशन युवा स्वास्थ मोहीम राबवण्यात येणार आहे. या काळात मनपा आरोग्य विभागातर्फे शहरातील सर्व महाविद्यालयात लसीकरणासाठी पथक पाठवले जाणार आहे. त्याचप्रमाणे १०० टक्के लसीकरण करून घेण्यात येणार आहे. मिशन युवा स्वास्थ्य मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढे यावे असे आवाहन डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात ८५ ते ९० महाविद्यालय असून आरोग्य विभागाने महाविद्यालयांशी संपर्क करून लसीकरण सत्राच्या तारखा निश्चित केल्या जात आहेत. त्यानुसार आज या मोहिमेच्या पहिल्या दिवशी शहरातील विवेकानंद महाविद्यालय आणि एमपी लॉ कॉलेज या ठिकाणी लसीकरण सुरू झाले आहे. महानगरपालिकेचे पथक याठिकाणी लसीकरण करत आहे. यात विवेकानंद महाविद्यालयात ८० ते १०० विद्यार्थ्यांची दुपारपर्यंत लसीकरणासाठी नोंदणी झाली होती. तर एमपी लॉ कॉलेज मध्ये आत्तापर्यंत २८ विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे. तर एकूण ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे महाविद्यालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!