Share

औरंगाबाद मनपा क्षेत्रात तीन लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच पेक्षा कमी आल्याने ७ जूनपासून शहरात अनलॉक करण्यात आले आहे. मात्र येत्या काळात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने कोरोना प्रसारात मुख्य भूमिका असलेल्या सर्वांचेच लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणात महापालिकेने तीन लाख २६ हजार ८३० एवढा टप्पा पूर्ण केला आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने शहरातील ११५ वाॅर्डात लसीकरण केंद्र सुरू केले. जम्बो लसीकरण मोहिम औरंगाबाद पालिकेने सुरू केली. सुरुवातीस महापालिकेला लसीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या. त्यामुळे एका दिवसात सरासरी दहा ते अकरा हजार जणांचे लसीकरण सुरू होते. लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागत होत्या.

दरम्यान १ जून पासून १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने लसीकरण सुरू केले व त्यानंतर केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर ८४ दिवसांनी वाढवले. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर पहिला तसेच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोजी रोडावली आहे. ४५ वर्षांवरील सुमारे तीन लाख नागरिकांनी आत्तापर्यंत लस घेतलेली नाही. सध्या ८०० ते ९०० नागरिकांचे दररोज लसीकरण सुरू आहे. सध्या दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या एक लाखापेक्षा कमीच आहे. त्यामुळे सुमारे सव्वा दोन लाख नागरिकांना महापालिकेला दुसरा डोस द्यावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!