औरंगाबाद : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कोविड-१९ अंतर्गत कंत्राटी तत्वावर नियुक्त असलेले प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमर विनायक लोखंडे यांनी आपल्या पगारातील १५ दिवसांचा पगार सोमवारी (दि.१४) कोरोनाच्या कामासाठी महानगरपालिकेकडे देणगी स्वरूपात जमा केला. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोरोनाच्या काळात अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. आप्तांना गमावले. बऱ्याच रुग्णांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्यांना वेळेवर औषधे न मिळाल्याने गैरसोईस सामोरे जावे लागले. ही बाब लक्षात घेऊन आपण ही या समाजाचाच एक घटक आहोत या भावनेने समाजसेवा म्हणून लोखंडे यांनी आपल्या पगारातील १५ दिवसांचा पगार आज धनादेश स्वरूपात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आणि डॉ. पारस मंडलेचा यांच्या कडे सुपूर्द केला.
पंधरा दिवसांपूर्वी झाल्टा फाटा येथील चेक पॉईंट जवळ अपघात झालेल्या एका दाम्पत्याचा व त्यांच्या मुलाचा जीव वाचवला. तसेच त्यांच्यावर अत्यावश्यक प्रथमोपचार करून त्यांना शासकीय महाविद्यालय घाटीत दाखल केले. त्यांच्या या कार्याबद्दल प्रशासक आस्तिक कुमार पांडेय व आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी त्यांची प्रशंसा केली. लोखंडे यांच्या हातून पुढे अशीच समाजसेवा घडावी असे गौरव उद्गार डॉ पाडळकर यांनी यावेळी काढले. या वेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ संगीता पाटील, डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतीत पाणी शिरुन झाले नुकसान, उपाय योजना करण्याचे निर्देश
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- महाराष्ट्राला मोठा दिलासा ; आज राज्यात तब्बल ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
- ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे निर्देश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

