Share

‘भारतात अमेरिकेपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण!’, मोदी सरकारची माहिती

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. भारतात देखील सध्या मोठ्या संख्येनं लसीकरण करण्यात येत आहे. देशात लसीकरणाचा चौथा टप्पा पार पडत आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत आहे. तर येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आता लसीकरणावर आणखी जोर देण्याची गरज भासू लागली आहे.

दरम्यान, भारतात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झालाय. पण तरीही भारताने लसीकरण मोहिमेत अमेरिकेला मागे टाकलेय. अमेरिकेपेक्षा भारतात सर्वाधिक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. यासाठी निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी जागतिक आकडेवारीचा दाखला दिला.

त्यानुसार अमेरिकेच्या तुलनेत भारतात कोरोना लसीचा पहिला डोस सर्वाधिक नागरिकांनी घेतला आहे. त्याचबरोबर भारतातील लसीकरणाची आकडेवारी त्यांनी जाहीर केली. देशात ४ जूनपर्यंत १७.८५ कोटी लोकांना सीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस ४.५६ कोटी लोकांनी घेतला असून आतापर्यंत एकूण २२.४१ कोटी डोस दिले गेले आहेत. लसीरकरण मोहिमेंतर्गत ६० वर्षांवरील ४३ टक्के लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

‘जागतिक आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत १७.२ कोटी नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तर अमेरिकेत हीच संख्या १६.९ कोटी इतकी आहे. गुरुवार प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. इंग्लंडमध्ये ३.९ कोटी लोकांनी, तर जर्मनीत ३.८ कोटी लोकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती निती आयोगाचे सदस्य व्ही. के पोल यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!