नवी दिल्ली : देशातील १२-१७ या वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू करण्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी दिले. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
भाजप संसदीय पक्षाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. १२ ते १७ या वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होईल, असे मंडाविया यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत हा मोठा लसउत्पादक देश असून, आणखी कंपन्यांच्या लशींना लवकरच परवानगी मिळेल, असे मंडाविया म्हणाले.
दुसऱ्या बाजूला देशातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 46 कोटी 23 लाखांहून अधिक मात्रा पुरवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. याशिवाय लसीच्या आणखी 1 कोटी 20 लाख सत्तर हजारांहून अधिक मात्रा आगामी काळात राज्यांना पुरवल्या जाणार आहेत.
लसीच्या 2 कोटी 18 लाख मात्रा राज्यांकडे आणि खाजगी रुग्णालयांकडे अजूनही शिल्लक आहेत. देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचा आवाका आणि गती वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नाही; ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे’
- नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल
- भविष्यात कोरोना संसर्गापासून बचावासाठी काळजी घ्या, आमदार निलंगेकरांनी केले सांत्वन
- केंद्राकडून पूरग्रस्तांना ७०१ कोटींचा निधी, सदाभाऊ खोत यांनी मानले मोदींचे आभार
- नदीपात्रातील व ओढ्यावरील अवैध बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देवू नका – अजित पवार


