Share

आजपासून १८ प्लससाठी पाच केंद्रावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरण

Published On: 

परभणी : भारतभर १८ वर्षांच्या वरील सर्व नागरिकांसाठी १ मे पासून कोराेना प्रतिबंधक लसीकरण सुरु केले आहे. दरम्यान शनिवारपासून परभणी शहरातील ५ केंद्रावर हे लसीकरण करण्याची ही मोहिम शनिवार सुरु झाली. शनिवार ( दि.१) ते ७ मे पर्यंत सुरु करण्यात आली आहे. या वेळी पालकमंत्री नवाब मलिक तसेच जिल्हाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

कोरोनावर मात करण्याकरिता केवळ लसीकरण करणे हाच प्रभावी उपाय आहे. या अनुसरुन केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय घेतला असला तरीही लसीचा तुटवडा देखील भासत आहे. या वेळी प्रतिनिधीक स्वरुपात या माेहिमेला सुरुवात करण्यात आली. या वेळी सात दिवस शहरातील ५ केंद्रावर लस देण्यात येणार आहे.

शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच मनपाच्या चार अश्या एकुण ५ लसीकरण केंद्रावर १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री नवाब मलीक यांनी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांनी नोंदणी केल्यानुसार लसीकरण करुन घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!