सांगली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेने गती घेतली आहे. परंतु शासनाकडून लसीचा पुरवठा अनियमित होत आहे. शनिवार दि. ३ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाकडे २ लाख लसींची मागणी नोंदविली होती. मात्र शुक्रवार दि. ९ एप्रिल पर्यत सांगलीला एकाही लसीचा पुरवठा होऊ शकलेला नाही. जिल्हा प्रशासनाने आतापर्यत २ लाख ६४ लसीचे डोस नागरिकांना दिले आहेत. आज शुक्रवारी १३०० लस उपलब्ध होत्या. त्यापैकी ८०० लस महापालिका क्षेत्रातील काही लसीकरण केंद्रावर तर इतर ५०० ग्रामीण केंद्रावर उपलब्ध होत्या. या लसीचा साठा काहीवेळातच संपल्याने आज पासून लसीकरण मोहीम थांबली आहे. मागणी केलेल्या लस उपलब्ध झाल्यावर लगेचच लसीकरण मोहिम पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली
मागील आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याचप्रमाणे ४५ वर्षापुढील व्यक्तींमध्ये लसीबाबत जागरुकता देखील वाढली आहे. मध्यंतरीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये दिवसराला पंधरा हजार लसीकरणाचे उद्दीष्ट ठरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर तीन दिवसानंतरच जिल्ह्यातील लसीचा साठा संपत आल्याचे चित्र पहावयास मिळाले. सध्या जिल्ह्यात २२७ केद्र कार्यरत आहेत. लसीचा साठा संपत असल्याने जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर लसीकरण मोहिम थांबविण्यात आली होती.
तसेच केंद्राबाहेर लस संपल्याचे फलक देखील लावण्यात आले होते. सध्या ४५ वर्षावरील ६ लाख लोकसंख्येपैकी २ लाख ६४ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १० टक्के लोकांनी लसीचा दुसरा टप्पाही पूर्ण केला आहे. बुधवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी लसीकरण मोहिम सुरु झाली तेव्हा सुमारे तेरा हजार लस उपलब्ध होत्या. मात्र नागरिकांचा प्रतिसाद पाहता दिवसभरात विविध केंद्रावर लसीचा साठा अत्यंत अपुरा होता. साहजिकच अनेकांना विना लसीचे माघारी परतावे लागले.
कोरोना लसींचा साठा संपल्याने जिल्हा प्रशानाच टेन्शन वाढले आहे. आतापर्यत पाच ते सहा वेळा लसीचे डोस जिल्ह्याला मिळाले आहेत. मागील आठवड्यात ५० हजार डोस जिल्ह्यात आले होते. जिल्हा आरोग्य खात्याने प्रस्ताव शनिवारी २ लाख लसीची मागणी केली होती. परंतु अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. नजीकच्या दोन दिवसात लसीची मागणी पूर्ण होईल आणि सांगलीस २ लाख लस उपलब्ध होतील अशी जिल्हा प्रशासनास आशा आहे.
महत्वाच्या बातम्या
- एमपीएससीच्या मुद्यावरून मिटकरींनी पडळकरांना डिवचले; ट्वीट करून लगावला टोला
- यम है हम! जालनावासियांना घरी बसवण्यासाठी यमराज आले रस्त्यावर
- भारतातील ‘ या ‘ शहरांमध्ये असतील टेस्ला कारचे शोरुम
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने रोहित शर्माविषयी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
