Share

भारतातील ‘ या ‘ शहरांमध्ये असतील टेस्ला कारचे शोरुम

Published On: 

नवी दिल्लीः देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती यामुळे अनेक वाहन धारक अगोदरच त्रस्त झालेले असताना नवीन वाहन खरेदी करणारे ग्राहक देखील इंधन दरवाढीमुळे वाहन खरेदी करण्याकडे कल कमी ठेवतात. मात्र इलेक्ट्रॉनिक वाहनं यावर एक मोठा पर्याय म्हणून समोर येत आहेत.

प्रदूषण आणि इंधन दरवाढ यामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांचा मध्य मार्ग सर्वांसाठीच सोयीस्कर असल्याचं सरकारकडून देखील वेळोवेळी सांगण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या किंमती जास्त आणि चार्जिंग हा मोठा प्रश्न असल्याने ग्राहक ही वाहने खरेदी करण्याकडे जात नाहीत. यामध्ये कमीत कमी किमतीमध्ये वाहन निर्मिती करण्याची तयारीदेखील वाहन उद्योग आणि दर्शवली आहे.

दरम्यान सध्या बाजारात अनेक इलेक्ट्रॉनिक कार येत असून एलन मस्कची अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतातील तीन शहरात टेस्ला त्याच्या शोरूम साठी जागेच्या शोधात आहे. जानेवारीत टेस्लाने भारतात एका स्थानिक कंपनीची नोंदणी केली होती. ही कंपनी टेस्लाची पहिली मॉडेल ३ सेदान आयात करून भारतात त्यांची विक्री करणार आहे. २०२१ च्या मध्यापर्यंत हे काम सुरु होईल असे समजते.

यासाठी टेस्ला नवी दिल्ली मध्ये २० ते ३० हजार चौरस फुट व्यावसायिक जागा शोधात आहे. मुंबई आणि बंगलोर येथेही कंपनी शोरूम सुरु करणार आहे. त्यासाठी भारताच्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बॉडीचे माजी कार्यकारी मनुज खुराणा यांच्यावर जबाबदारी दिली गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन दिले जात असले तरी चार्जिंग साठी पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही. त्यातही आयात कार्सवर टेस्लाला भरावा लागणारा कर त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!