पुणे – कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तसेच सरकारमधील आणि विरोधातील या दोन्ही बाजूच्या नेेत्यांनीही ही मागणी लावून धरायला सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे एमपीएससीच्या उमेदवारांच्या मागणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे.
MPSC परिक्षा पुढे ढकला म्हणुन सर्व विद्यार्थ्यांनी आग्रह धरलाय.मागील काळात काही हौसी आंदोलनजीवी रस्त्यावर झोपले होते, त्यानंतर MPSC ची तयारी करणाऱ्या 2 गरीब विद्यार्थ्यांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या उतावीळ नेत्यांनी आता तरी आडवे येऊ नये.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 9, 2021
एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला राजकीय टीका-टिपण्णी देखील होताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील मुद्द्यावर भाष्य केले आहे. MPSC परिक्षा पुढे ढकला म्हणुन सर्व विद्यार्थ्यांनी आग्रह धरलाय.मागील काळात काही हौसी आंदोलनजीवी रस्त्यावर झोपले होते, त्यानंतर MPSC ची तयारी करणाऱ्या 2 गरीब विद्यार्थ्यांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या उतावीळ नेत्यांनी आता तरी आडवे येऊ नये. असा टोला त्यांनी एमपीएससीची परीक्षा घेण्यासाठी गेल्या महिन्यात आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.
दरम्यान, राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘बोर्ड परीक्षा एकतर रद्द कराव्यात किंवा रीशेड्यूल केल्या पाहिजेत’
- गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेवून केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या
- पतीच्या मित्राचा विवाहितेवर अत्याचार, साडेआठ लाखही उकळले
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पंढरपुरातील ‘त्या’ सभेच्या आयोजकांवर अखेर गुन्हा झाला दाखल
- ‘भिडेंनी वैज्ञानिक, डॉक्टरांचा अपमान केलाय,त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा’


