Share

औरंगाबादेत लसीकरणाला ब्रेक! बंद केंद्रांसमोर नागरिकांची गर्दी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने मनपा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. शहरात चार लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून लसींच्या निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिम पुन्हा एकदा बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी (दि.३०) सलग दुसऱ्या दिवशी लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण मोहिम संकटात सापडली आहे. मात्र आज तरी लस मिळेल या आशेने शहरातील बंद असलेल्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी सकाळी सकाळी गर्दी केली होती.

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी औरंगाबादकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र आता पुन्हा एकदा लसींच्या तुटवड्याचे संकट समोर उभे राहिले आहे. आता महापालिकेकडे केवळ ३०० लस शिल्लक आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास ७७ लसीकरण केंद्र तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. मंगळवारप्रमाणे आज बुधवारी (दि.३०) केवळ प्रोझोन मॉल याठिकाणी ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन तर सुरु राहणार आहे. तसेच आजपासून कोवॅक्सिन लसींचे पहिले डोस देखील दिले जाणार आहेत. राजनगर, क्रांती चौक, एमआयटी हॉस्पिटल एन-२ याठिकाणी कोवॅक्सिनचा पहिला डोस आज मिळेल.

महापालिकेने शासनाकडे १ लाख लसींची मागणी केली आहे. मात्र पुरवठा कधी होइल याबाबत काहीही सांगता येणार नाही. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे लसीकरणावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. शनिवारी सुमारे दोन हजार लसी शिल्लक होत्या. रविवारी (दि.२७) मनपाला १२ हजार लसींचा साठा मिळाला होता.

यामधून सोमवारी (दि.२८) १५ हजार ३९६ जणांचे लसीकरण करण्यात आले. मात्र आता केवळ ३०० लसींचा साठा शिल्लक आहे. आज लसींचा साठा आला नाही तर प्रोझोन मॉल याठिकाणी सुरु असलेले लसीकरणही बंद करावे लागेल. २२ जूनपासून शहरात १८ प्लस लसीकरणाला जोरदार सुरुवात झाली. पाचच दिवसात ६० हजार जणांनी लस टोचून घेतली. सर्वच ठिकाणी तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळत होता. मात्र लसींचा पुरवठा होईपर्यंत नागरिकांवर आता ताटकळण्याची वेळ आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!