Share

बॉक्सिंगचा बच्चन येतोय! फरहान अख्तरच्या ‘तुफान’चा ट्रेलर प्रदर्शित

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरच्या तुफानचा ट्रेलर आज प्रदर्शित प्रदर्शित करण्यात आला. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ यांच्या वतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित तूफान या चित्रपटामध्ये अभिनेता फरहान अख्तर हा मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे.

फरहान अख्तर हा या चित्रपटात मुंबईतील डोंगरी भागातील स्थानीक गुंडा अज्जु भाईचे पात्र साकारत आहे. त्याच्या आयुष्यात अनन्याचे प्रेम येताच त्याचे आयुष्य बदलुन जाते. ती त्याला बॉक्सिंग चॅम्पियन बनन्यासाठी ती त्याला तयार करते. गुंडा ते बॉक्सर असा फरहान अख्तरचा हा प्रवास या चित्रपटाद्वारे सादर केला जाणार आहे. अज्जू भाईचा एक निर्णय़ त्याला बॉक्सिंगच्या वर्तुळात आणून सोडतो. फरहानच्या प्रेयसीच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेत अभिनेते परेश रावल हे आहेत. तर इतर कलाकारामध्ये सुप्रिया पाठक शाह, हुसैन दलाल यांचा समावेश आहे.

तुफान या चित्रपटात फरहान, मृणाल व्यतिरिक्त परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश यांनी केले आहे. हा चित्रपट १६ जुलै रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!