Share

आता ६५ केंद्रांवर लसीकरण, मनपाकडे १८ हजार लसींचा साठा शिल्लक

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महापालिकेच्यावतीने शहरात आज पर्यंत एकूण ४३ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात होती. त्यात मंगळवारी ७ हजार ९६ नागरिकांना लस देण्यात आली. त्यात महापालिकेकडे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन अशा दोन्ही मिळून १८ हजार लसींचा साठा शिल्लक असल्यामुळे आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेत. बुधवारी शहरात ६५ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे मागील आठवड्यात चार दिवस लसीकरण बंद होते. मात्र, गुरुवारी रात्री कोव्हिशिल्ड लसींचा साठा महापालिकेला प्राप्त झाला. त्यामुळे लसीकरण मोहीम पुन्हा सुरू झाली. रविवारी लसीकरणाला सुट्टी होती. आज मंगळवारी शहरात मनपाच्या ४३ केंद्रांवर ७ हजार ९६ जणांना लस टोचण्यात आली.

आता मनपाकडे कोविशिल्ड लसींचे १६५५० डोस आणि कोव्हॅक्सीनचे १७०० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी आणखी काही केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी ६५ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यापैकी ६२ केंद्रांवर कोविशिल्ड तर ३ केंद्रांवर कोव्हॅक्सीन लसींचा डोस दिला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!