मुंबई : भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात टीम इंडियाने १५१ धावांनी विजय मिळवला आहे. चौथ्या डावात भारताने दिलेल्या २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपुर्ण संघ १२० धावांवर बाद झाला. या विजयासह भारताने पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून कर्णधार जो रुटने दोन्ही डावात सर्वाधीक धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त इंग्लंडचे इतर फलंदाज अपयशी ठरले. यात इंग्लंडचा अष्टपैलु खेळाडू सॅम करनने एक लाजीरवाना विक्रम आपल्या नावे केला. लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात भोपळा न फोडता बाद झाला. लॉर्ड्सवर गेल्या १३७ वर्षांच्या इतिहासात अशी लाजीरवाणी कामगीरी करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. दोन्ही डावात तो पहिल्याच चेंडुवर बाद झाला.
England's king pairs in Test cricket ????
???? William Attewell vs AUS, 1892, Sydney
???? Ernie Haynes vs SA, 1906, Cape Town
???? James Anderson vs IND, 2016, Vizag
???? Sam Curran vs IND, 2021, London ????It's also the first king pair by a Test batter at Lord's.#ENGvIND pic.twitter.com/mQRX1v33Di
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 16, 2021
जर एखादा खेळाडू एकही धाव न काढताच पहिल्याच चेंडुवर बाद झाला तर त्याला गोल्डन डक म्हणतात. पण जर कसोटीत दोन्ही डावात फलंदाज एकही धाव न काढता बाद झाला तर त्याला किंग पेअर म्हणतात. सॅम करनला पहिल्या डावात इशांत शर्माने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. तर दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने पंतकरवी झेलबाद केले. तसेही कसोटी क्रिकेटमध्ये दोन्हा डावात शुन्यावर बाद होणारा इंग्लंडचा केवळ चौथा फलंदाज ठरला. यापुर्वी विल्यम अॅटवेल, एर्नी हायन्स आणि जेम्स अँडरसन हे खेळाडू दोन्ही डावांत शून्यावर बाद झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहिंग्यांना आश्रय दिल्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या, अफगानी नागरिकांना आम्ही आश्रय देणार नाही – बांगलादेश
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !

