Share

तर गोपीचंद पडळकर भाजपमधून बाहेर पडतील, जानकरांचा दावा

Published On: 

सोलापूर: भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वापरलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकारण तापले आहे. पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तर भाजपने त्यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. त्यामुळे पडळकर देखील एकटे पडल्याच दिसत आहे. आता त्यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे उत्तमराव जानकर यांनी निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासोबत बेईमानी केली आहे. येत्या आठ दिवसांत पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींचा खुलासा करणार आहे. त्यानंतर स्वतः गोपीचंद पडळकर भाजपमधून बाहेर पडतील, असा दावा उत्तमराव जानकर यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केला आहे.

धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांना दगलबाज तर फडणवीस यांना भामटा म्हणता येऊ शकत, पण आमची ती संस्कृती नाही. पडळकर हे केवळ प्रसिद्धीसाठी भडक विधाने करत आहेत. अशाप्रकारे विधानेकरून प्रसिद्धी मिळवणे चुकीचे असल्याचं जानकर म्हणाले आहेत.

दरम्यान, पडळकर यांनी केंद्र सरकारकडून ‘धनगर आणि धनगड’ ही दुरुस्ती केंद्राकडून करून आणावी, राज्य सरकारकडून त्याची अमलबजावणी करण्याच काम मी करतो. पण आजवर केवळ आश्वासन देऊन मोदी – फडणवीस यांनी धनगर समाजाशी केलेली बेईमानी मी पत्रकार परिषद घेत येत्या आठ दिवसांत मांडणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोण आहेत उत्तमराव जानकर
उत्तमराव जानकर यांचे नाव धनगर आरक्षण लढ्यात आघाडीवर आहे. गोपीचंद पडळकर यांच्या सोबतीने त्यांनी ‘धनगर आरक्षण – अखेरचा लढा’ म्हणून मोठे आंदोलन छेडले होते. पडळकर – जानकर जोडीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत सभा घेतल्या होत्या. दोघांमध्ये आजवर मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत.

नेमक म्हणाले होते पडळकर
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

सावधान ! कोरोना बळावतोय, देशात आणि राज्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

#coronavirus : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६५ हजारांवर

मुंबईत कोरोनाचा हाहाकार; शिवसेनाभवन पुढील काही दिवस बंद राहणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!