Share

सावधान ! कोरोना बळावतोय, देशात आणि राज्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

Published On: 

नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनचा कालावधी संपत येत असतानाच देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. भारतातील  सध्या रुग्णांची संख्या ही आता 4067वर पोहोचली असून  त्यापैकी 2091 रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले  आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 109जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची  संख्या वाढत असल्याने 14 एप्रिलला  संपणारा   लॉकडाऊन हा  पुढे काही  दिवस तसाच चालू राहतो की काय हे पाहावे लागणार आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 600 पार गेला आहे. सध्या राज्यात 690 कोरोनाबाधित रुग्ण असून सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहेत. प्रशासनाकडून खबरदारी घेऊन देखील रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर देखील मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन पुढे चालू ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 11, तेलंगणामध्ये 7, मध्यप्रदेशमध्ये 9, दिल्लीमध्ये 7, पंजाबमध्ये 5, कर्नाटकात 4, पश्चिम बंगालमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये तीन, आंध्रप्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

जर तब्लिगी जमातीतील लोकांना कोरोनाची बाधा झाली नसती तर देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत वेगळी असती. फक्त तब्लिगींमुळे 21 राज्यांत एकूण 1095 कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आतापर्यंत देशात 274 जिल्हे कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत.

मरकज प्रकरण नसतं झालं तर भारताचा कोरोना संसर्ग दर अत्यंत कमी असता, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अग्रवाल यांनी सांगितलं. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘Covid-19 चे रूग्ण सध्याच्या स्थितीत दिवसाला सरासरी 4.1 असे दुप्पटीने वाढत आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!