पाटोदा : केंद्र सरकारने ४४ कामगार कायदे सुधारणा करून ४ विधेयकात बसवले आहेत. यातील सुधारीत कामगार कायद्यामध्ये उसतोड मजुरांच्या संदर्भातील कायद्याचा समावेश करावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार सुरेश धस यांनी केंद्रीय राज्यमंत्री संतोष गंगवार यांची भेट घेतली. या मागणीचे निवेदन आमदारानी यावेळी केंद्रीय मंत्र्याना सादर केले.
केंद्र शासनाने जुने अस्तित्वात असलेले सर्व कामगार कायदे सुधारित केले आहे. नवीन सुधारणेनुसार हे सर्व कामगार कायदे हे चार विभागात केले गेलेत. ऊसतोड मजुरांचा समावेश त्यामधील सामाजिक सुरक्षा कायदा सन २०२० मध्ये करण्यात यावा आणि ऊसतोड मजुरांच्या विम्या संदर्भात आणि मजुरांच्या उद्भवणाऱ्या प्रश्नासंदर्भात त्यांना न्यायिक आधिष्ठान मिळवुन द्यावे. या मागणीसाठी आमदार धस यांनी केंद्रीय राज्यमंत्री गंगवार यांची भेट घेतली. यासह कामगार सचिव अपुर्व चंद्रा यांचीही भेट घेत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असल्याचे आमदार धस यांनी सांगितले.
या बैठकीत आमदार सुरेश धस यांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन केंद्रीय राज्य मंत्री संतोष गंगवार यांनी याबाबत सकारात्मक भुमिका घेऊ, असे आश्वासित केले. तसेच बैठकीत केंद्र शासनाने पारीत केलेल्या सुधारीत कामगार कायद्यामध्ये ऊसतोड मजुरांच्या संदर्भातील कायद्याचा समावेश करावा, अशी मागणी केली. यासह कामगारांच्या अडचणी मांडत सुविधा देण्याच्या अनुषंगानेही चर्चा केली. पुढील आठवड्यात धस यांना नवीदिल्ली येथे ऊसतोड मजुरांच्या मसुद्याबाबत चर्चा करुन तो कायदा करण्यासाठी चर्चेसाठी पुन्हा आमंत्रित करण्यात आलेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंना ज्या प्रकरणात न्यायालयात आज हाजर व्हावे लागले ते प्रकरण नेमके आहे तरी काय ?
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
