🕒 1 min read
मुंबई:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशात मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही, इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी केला जातोय. याची गरज नाही, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी चायना किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवरही इतका बंदोबस्त पाहिला नाहीये जितका शेतकऱ्यांसाठी केलाय. इतका बंदोबस्त करण्याची आवश्यकता नाहीये. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. शेतकरी आंदोलन फार चिघळलं आहे. हे आंदोलन इतकं चिघळण्याची गरज नव्हती. सरकारने आणलेला कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असू शकतात.
प्रत्येक राज्यात एक कृषी खातं आहे आणि प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याशी चर्चा करुन केंद्राने या गोष्टींचा निर्णय घ्यायला हवा होता. हे प्रकरण इतकं चिघळण्याची आवश्यकता नव्हती, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलंय.
महत्वाच्या बातम्या
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
- लवकरच लाँच होणार रियलमीचा नवीन स्मार्टफोन !
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या ‘या’ एक्स्पर्टवरही आयपीएल लिलावात लागणार दाव
- ‘बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री झाल्यास जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
