नवी मुंबई : वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयात आज शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर झाले. न्यायालयाने 15 हजार रूपये जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका केली.
26 जानेवारी 2014 रोजी अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात टोलनाक्याच्या संदर्भात भाष्य केलं होतं. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील टोलनाक्याबाबत भाष्य केले केले होते.
टोलनाक्यावरून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा टाकला जात असून यांना अद्दल घडवा असे वक्तव्य केले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या या भडकावू भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता असा ठपका ठाकरे यांचावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी बेलापूर न्यायालयाने राज ठाकरेंना वॉरंट बजावत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते.
दरम्यान, याप्रकरणी 5 मे रोजी पुढील सुनावणी होणार असून त्यांना पुढच्या तारखेला सुनावणीसाठी हजर राहण्याची गरज नसल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वकील राजन शिरोडकर यांनी पत्रकारांना दिली.
महत्वाच्या बातम्या
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
- लवकरच लाँच होणार रियलमीचा नवीन स्मार्टफोन !
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात
- ‘बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री झाल्यास जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
