🕒 1 min read
मुंबई: कोरोना नंतर उद्योग व्यवसाय उभारी घेत आहेत. यामध्ये वाहन उद्योगांमध्ये नवनवीन अद्ययावत वाहने बाजारपेठेत यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्याप्रमाणावर वापर होत आहे. त्याचबरोबर सरकारकडून देखील वायू आणि ध्वनी प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी नागरिकांना आवाहन करून प्रोत्साहन दिले जात आहे.
दरम्यान ह्युंदाईने याचे डिझेलचे व्हेरिअंटच बंद केले याचे कारण ह्युंदाईने ही कार 2015 मध्ये लाँच केली होती. तेव्हापासून ही कार ग्राहकांमध्ये कमालिची लोकप्रिय आहे. 2020 मध्ये या कारचे नवीन जनरेशन कंपनीने लाँच केले आहे. याला काही महिने होत नाहीत तोच कंपनीने ह्युंदाईचे E व्हेरिअंट बंद केले आहे. मात्र तरी देखील ह्युंदाईची क्रेटा ही एसयुव्ही सर्वाधिक पसंतीची कार बनली आहे.
ह्युंदाईने क्रेटा चे E व्हेरिअंट वेबसाईटवरून हटविले आहे. नवीन क्रेटा लाँच झाली तेव्हा तिचे E, EX, S, SX आणि SX (O) व्हेरिअंट देण्यात आले होते. आता यापैकी ई व्हेरिअंट जे बेस मॉडेल आहे ते हटविण्यात आले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आता केवळ पेट्रोल ई व्हेरिअंट उपलब्ध आहे. हे व्हेरिअंट ग्राहक 999,990 रुपये एक्स शोरुममध्ये खरेदी करू शकतात. काही काळापूर्वी कंपनीने माहिती दिलेली की, क्रेटाच्या डिझेल मॉडेलची मोठा मागणी आहे. 100 पैकी डिझेल 60 आणि पेट्रोलच्या 40 गाड्या विकल्या जातात. मागणी वाढत चालल्याने डिझेल ई व्हेरिअंटचा वेटिंग पिरिएड हा 10 महिन्यांपेक्षा जास्त गेला आहे. यामुळे कंपनीने हे मॉडेल वेबसाईटवरून हटविले आहे. हेच यामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
क्रेटाला तीन इंजिन प्रकारात लाँच करण्यात आले होते. 1.5 लीटर पेट्रोल, 1.4 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन असे होते. सर्व इंजिनना 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड देण्यात आला होता. तसेच 6-स्पीड ऑटोमेटिक आणि 7-स्पीड डीसीटी गियरबॉक्स देखील देण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये जेव्हा इतर कंपन्यांच्या कारची मागणी ठप्प झाली होती. तेव्हा क्रेटाची 55000 हून अधिक बुकिंग कंपनीने घेतल्या होत्या. ऑक्टोबर 2020 ला हीच बुकिंग 1.15 लाख वर गेली होती. जास्त मागणी झाली तर कंपन्यांनी खूश व्हायला हवे, मात्र इथे उलटेच झाले आहे. कंपनीने कारच बंद केली आहे. आता ही बंदी कायमची की तात्पुरती ते काही महिन्यांनीच समजू शकणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
- लवकरच लाँच होणार रियलमीचा नवीन स्मार्टफोन !
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या ‘या’ एक्स्पर्टवरही आयपीएल लिलावात लागणार दाव
- ‘बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री झाल्यास जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
