मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या सौदंर्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडीयावर तिच्या फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो. वेगवेगळ्या म्युझीक अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला उर्वशी येत असते.
यादरम्यान उर्वशी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. उर्वशी रौतेलाला महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. उर्वशीला महाराष्ट्र शासनाचा ‘स्त्री शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भंगतसींह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार उर्वशी रौतेलाला प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्विकारतानाचा फोटो उर्वशीने सोशल मीडीयावर शेअर केला आहे.
#StreeShakti #NationalAward I thank the hon’ble Governor of Maharashtra @BSKoshyari & high officials / representatives of our country ???????? because this has been accorded to me by them and our people. Such a proud moment for our Rautela family my parents. In my country…#RajBhavan pic.twitter.com/nbDmVFnVuk
— URVASHI RAUTELA???????? (@UrvashiRautela) June 30, 2021
ट्विटरवर फोटो शेअर करताना तीने लिहीले आहे की,’ स्त्री शक्ती पुरस्काराचा मान मला देण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगंतसींह कोश्यारी आणि उच्च अधिकारी तसेच या देशातील प्रतिनीधीचे मी आभार मानते. रौतेला कुटुंबासाठी हा खुप अभिमानाचा क्षण आहे.’ असे लिहीले आहे. या फोटोत उर्वशीसोबत तिची आई मीरा रौतेला ही दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या दुसर्या टप्प्यात ‘या’ खेळाडूंच्या उपलब्धतेवर समोर आली मोठी माहिती
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
- ‘शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या पडळकरांकडे ५० लाखांची गाडी कशी?’


