🕒 1 min read
मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर महिन्याभरात बीसीसीआयने या स्पर्धेच्या उर्वरित हंगामाची घोषणा केली. मात्र याच कालावधीत अनेक आंतरराष्ट्रीय संघाचे वेळापत्रक व्यस्त असल्याने विदेशी खेळाडु आयपीएलमध्ये खेळु शकणार नाहीत.
यादरम्यान आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची पुर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यातुन अनेक प्रमुख खेळाडुंनी आयपीएलमुळे माघार घेतल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान बीसीसीआयला परदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल मोठा दिलासा मिळाला आहे. एका अहवालानुसार, बरेच ऑस्ट्रेलियन खेळाडू टी-20 लीगमध्ये भाग घेण्यासाठी उपलब्ध असतील. क्रिकबझच्या वृत्तानुसार, टी-20 पुन्हा सुरु होईल तेव्हा ग्लेन मॅक्सवेल (, झे रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टॉइनिस आणि डॅनियल सॅम्स उपलब्ध असतील. आयपीएलचा दुसरा टप्पा आणि टी-20 विश्वचषक युएईमध्ये होणार असून परदेशी खेळाडूंच्या मनस्थितीत बदल होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
- ‘शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या पडळकरांकडे ५० लाखांची गाडी कशी?’
- ‘चपटी लावलेली असली की लोक हत्तीलाही मुंगी समजतात’, आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा


