Share

उर्वशीने माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ‘भगवद गीता’ दिली भेट; ते म्हणाले ‘सब शानदार..’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ब्यूटी क्वीन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Actress Urvashi Rautela) ही इस्रायल दौऱ्यावर आहे. दरम्यान तिने इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ( PM Benjamin Netanyahu Israel ) यांची भेट घेतली. त्यावेळी तिने त्यांना भगवत गीता (Bhagwat Gita) भेट म्हणून दिली आहे. उर्वशी रौतेलाने नेतन्याहू यांना हिंदी शिकवतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, जो लोकांना खूप आवड असून प्रचंड व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CXRmYFwoLnv/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर माजी पंतप्रधान बेंजामिन यांच्या सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. उर्वशी रौतेला यांना माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनेही माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना काही हिंदी शब्द शिकवले जे ‘सब शानदार.., सब ग्रेट’ असे होते. हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘इस्रायलच्या माजी पंतप्रधानांने मनापासून आभार. मला आणि माझ्या कुटुंबीयांना बोलावल्याबद्दल तुमचे आभार’ असे तिने म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CXS_9SBot1j/?utm_source=ig_web_copy_link

पुढे तिने भगवत गीतेचा उल्लेख करत म्हटले, ‘माझी भगवत गीत: योग्य व्यक्तीला योग्य वेळी चांगल्या मनाने एखादी भेट दिली आणि त्या बदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही तर ती भेट नेहमी लक्षात राहते.’ उर्वशी मिस यूनिवर्स २०२१ या स्पर्धेनिमित्त इस्रायलला गेली होती. तिला या स्पर्धेची परिक्षक म्हणून बोलावण्यात आले होते.

तिने २०१५मध्ये मिस यूनिवर्स स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. आता याच स्पर्धेत ती परिक्षक म्हणून दिसली आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशीचा वर्जिन भानुप्रिया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच भाग जॉनी, सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, काबिल, हेट स्टोरी 4, पागलपंती या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!