🕒 1 min read
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी ‘त्याला मी मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’ वक्तव्य ज्या मोदीसाठी केले होते, अखेर तो गावगुंड सापडला आहे. नागपुरात हा कथित गावगुंड समोर आला आहे. त्याने पत्रकार परिषद घेत ‘मी दारू विकतो आणि दारूच्या नशेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यास शिवीगाळही केली’ असे म्हटले आहे. मात्र या खुलास्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी नाना पटोले यांना गंभीर इशारा दिला आहे.
“अखेर नानाला वाचवण्यासाठी कॉंग्रेसने नकली गावगुंड सादर केलाच. मात्र हा नकली गावगुंडसुध्दा पत्रकारांच्या माऱ्यापुढे पळून गेला. विधानसभेचे अध्यक्ष असलेले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना का गावगुंडाच्या पदराखाली लपत आहेत. आता का भीती वाटत आहे. कितीही नकली गावगुंड सादर केले, किंवा कितीही मी असं बोललो नाही म्हटले तरी पंतप्रधानांचा केलेला अपमान जनता विसरणार नाही. आणि या गुन्ह्याला माफी नाही. म्हणून जर महाविकास आघाडी सरकारला कायद्याची जाण असेल तर, नाना पटोले यांना तात्काळ अटक करायला हवी. पण कॉंग्रेसचे लांगुलचालन करायचे असेल, लाळघोटेपणा करायचा असेल तर मात्र नानाला वाचवू शकता. मात्र तुम्ही कितीही वाचवले आणि नानाने कितीही नकली गावगुंड सादर केले तरी जनता मात्र नानाला वाजवणारच हे नक्की आहे.” असे अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान उमेश प्रेमदास घरडे असे या कथित गावगुंडाचे नाव असून त्याच्या गोंदी गावातील लोक त्याला ‘मोदी’ म्हणून ओळखतात असेही तो म्हणाला आहे. या कथित मोदीसोबत अॅड. सतीश उके उपस्थित होते. या ‘मोदी’ने नाना पटोलेंनी ज्या मोदीला मारण्याची भाषा केली, तो मीच आहे. असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी उमेशच्या नावापुढे मोदी लिहिले असलेली काही जुनी कागदपत्रेही दाखवली. त्यामुळे अखेर नाना पटोले यांनी ज्या मोदीबद्दल अपशब्द वापरले होते तो सापडला आहे. यावरच “हा बघा “मोदी” (टोपणनाव) असलेला व्यक्ती सापडला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करुन पंतप्रधान पदाची गरिमा राखता आली नाही.” असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अजित पवारांची मोठी घोषणा; नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी मंजूर
- प्रियंका चोप्रा बनली आई, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती
- तो ‘मोदी’ सापडल्यानंतर पटोले म्हणाले, “भाजपला पंतप्रधान पदाची गरिमा राखता आली नाही”
- “काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले”
- अभिमानास्पद! जम्मू काश्मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
