Share

कर्जमाफी योजनेत मोठा घोटाळा- राजू शेट्टीं

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – शेतकरी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला इतका विलंबाचं कारण आहे सरकारनं कर्जमाफीसाठी नेमलेल्या कंपन्या… कर्जमाफी योजनेत आयटी घोटाळा झाल्याचा आरोप केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत    असा अत्यंत खळबळजनक आरोप शेट्टींनी केलाय.

हा कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा असून, त्यात आयटी सचिव विजयकुमार गौतम आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी कौस्तुभ धवसे सहभागी आहेत, असा अत्यंत खळबळजनक आरोप शेट्टींनी केलाय. राज्य सरकारची, महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी कर्जमाफीचे काम करतेय, असं दाखवलं जात आहे. मात्र, गौतम आणि धवसे यांनी मागच्या दाराने नागपूरस्थित एका खाजगी कंपनीला हा काम दिले असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

२० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे हे काम विना टेंडर देण्यात आल्याचा आरोप देखील शेट्टी यांनी केला आहे. गौतम आणि धवसे यांनी स्वतःच्या हितासाठी अनुभव नसलेल्या कंपनीला हे काम दिले.

मात्र, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यादीतील घोळ, याद्या तयार न होणे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास होत असलेला उशीर… याला हा आयटी घोटाळा जबाबदार असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!