Share

भ्रष्टाचार कसा करायचा याचे सल्ले देणाऱ्या मंत्र्याचा जाहीर सत्कार करावा- सचिन सावंत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  ज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्यासाठी डांबराचा खर्च अर्धाच दाखवा, चांगल्या बातम्यांसाठी पत्रकारांना मॅनेज करा, हे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे असून या ‘पारदर्शक’ कारभाराबद्दल बांधकाममंत्र्यांचा जाहीर सत्कार करावा, असा सणसणीत टोला विरोधकांनी लगावला आहे.

‘डांबराचा खर्च अर्धाच दाखवा, बांधकाममंत्र्यांचा अजब सल्ला’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकांम मंत्र्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला.चंद्रकांतदादा म्हणतात तसे सार्वजनिक बांधकाम खाते वर्र्षाला ४ हजार कोटी रुपये खर्च करीत असेल तर मागील तीन वर्षात खर्चझालेले १२ हजार कोटी रुपये कुठे गेले? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, राज्यात पारदर्शक भ्रष्टाचार सुरु आहे. अधिकाºयांना भ्रष्टाचार कसा करायचा याचे सल्ले महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्या मंत्र्याने दिले नव्हते. पाटील यांनी ती कमतरता भरून काढली आहे. त्यामुळे त्यांचा शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार केला पाहिजे. राज्याचा कॅबिनेट मंत्री अशा प्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम करत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.यासोबतच पत्रकारांना मॅनेज करून चांगल्या बातम्या छापून आणा असे सांगण्याने माध्यमांच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभे होते, असेही सावंत म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!