Share

‘माझा स्टॅन स्वामी होऊ नये हीच इच्छा’, सचिन वाझेचं कोर्टात वक्तव्य

Published On: 

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया टॉवरजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक मनसुख हिरन याची ठाण्यात झालेली हत्या या प्रकरणात अटकेत असलेला आणि मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे याला हृदयविकारावरील उपचारांबाबत कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयानेसचिन वाझे याला हृदयाच्या आजाराशी संबंधी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली.

खासगी रुग्णालयात करण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च वाझे व त्याच्या कुटुंबिय करेल, असे विशेष एनआयए न्यायालयाने स्पष्ट केले. वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मिळावी यासाठी वाझे याने त्यांच्या वकिलामार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. आपल्या तीन धमन्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक ब्लॉकेज आहेत. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.

सचिन वाझेने कोर्टाला सांगितलं की आपला फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे जेल कोठडीतच मृत्यू होऊ नये अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे आपल्याला तातडीनं योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं. वाझेच्या वकिलांनी याआधी न्यायालयाला सांगितले होते की, मागील १४ दिवसांपासून त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे. तिथे त्याला ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला मिळाला आहे. याबद्दलची परवानगी मागताना वाझे याने न्यायालयामध्ये ‘माझा स्टॅन स्वामी होऊ देऊ नका, मला लवकरात लवकर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्या,अशी विनंती केली.दरम्यान, शहरी नक्षलवाद प्रकरणातील 84 वर्षीय आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा काही महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती.तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता. आधी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. मात्र, त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!