🕒 1 min read
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या घरात एका गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. ते पुन्हा एकदा आजोबा झाल्यामुळे आनंद व्यक्त करत आहेत.
दरम्यान अमिताभ बच्चन यांचे बंधू अजिताभ (Ajitabh Bachchan) बच्चन यांची मुलगी नैना बच्चनने (Naina Bachchan) म्हणजेच अभिनेता कुणाल कपूरच्या (actor Kunal Kapoor) पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. यामुळे अमिताभ यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. अभिनेता कुणाल कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गूडन्यूज दिली आहे.
अभिनेता कुणाल आणि नैनाने त्यांच्या लग्नाच्या सात वर्षांनंतर ही गोड बातमी दिली आहे. कुणाल पोस्ट शेअर करता म्हणाला, ‘नैना आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की आम्ही एका मुलाचे आई-बाबा झाले आहोत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद’ या पोस्टवर ऋतिक रोशनसह श्वेता बच्चन, सुजैन खान, अंगद बेदी, साइरस साहूकार, तारा शर्मा, अक्षय ओबरॉय यांच्यासह चाहत्यांनी लाईक्स कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.
कुणाल आणि नैना आई-बाबा झाल्यामुळे कपूर आणि बच्चन कुटुंबीय आनंदी झाले आहेत. अमिताभ आणि अजिताभ हे आजोबा झाल्यामुळे आनंद व्यक्त करत आहेत. कुणाल कपूर शेवटचा चित्रपट ‘अनकही कहानियां’ च्या माध्यमाने झळकला होता.
महत्वाच्या बातम्या:
- Budget 2022 : मानसिक आरोग्याच्या समस्यासाठी ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ’ कार्यक्रम सुरू केला जाईल- निर्मला सीतारामन
- Budget 2022 : केमिकल फ्री शेतीला प्रोत्साहन देणारे-अतुल भातखळकर
- हॉकी प्रो लीग: भारतीय महिला संघाकडून चीनचा ७-१ने पराभव
- “अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दोन वर्ष फुकट गेली, याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार”, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
- “मुख्यमंत्री दारात वाईन… मद्यधुंद सरकारची नशा कधी उतरणार?”, चित्रा वाघ यांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
