Share

VIDEO : अरेच्चा! शहनाज गिलची ‘ती’ स्टाईल अल्लू अर्जुनने तर केली नाही ना कॉपी?

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’ची लोकप्रियता आजवर कायम आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ साऊथ इंडस्ट्री पुरता मर्यादित न राहता सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘पुष्पा’तील गाणी, डायलॉग, स्टेप्स, चाहत्यांना भुरळ घातल आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनची (Allu Arjun) दाढीच्या खालून हात फिरविण्याची स्टाईल तर प्रचंड व्हायरल झाले आहे. मात्र शहनाज गिलच्या (bigg boss fame Shehnaaz Gill) एका व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.

अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा’ चित्रपट बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक ठरला. तसेच या चित्रपटातील स्टाईने तर देश-विदेशातील कलाकार, खेळाडूंना वेड लावलं. त्या स्टाईलवर अनेक व्हिडीओ देखील बनवून शेअर करण्यात आले. मात्र ती त्याची स्वत:ची ओरिजिनल स्टेप्स नाही किंवा चित्रपटातील कुणाचीही सिग्नेचर स्टेप्स नाही. तर ती शैली अल्लूने शहनाजपासून प्रेरित होऊन केली की काय? असं चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

दरम्यान सोशल मीडियावर बिग बॉस फेम शहनाज गिलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या हनुवटीच्या खालून हात फिरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ बिग बॉसच्या घरातील आहे. तिच्यासमोर कुणीतरी बसलेलं दिसून येत आहे. त्याला बोलत असताना शेहनाजने तिच्या हनुवटीवरुन हात फिरवला आहे. हीच स्टेप अल्लू अर्जुनने कॉपी केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काहींनी हसून दुर्लक्ष करत आहेत, तर काहींनी कमेंट करत  काय खरं आहे असं विचार करत आहे.

शहनाज गिलने २०१९ मध्येच पुष्पा रिलीज होण्यापूर्वी अल्लू अर्जुनच्या त्या सिग्रेचर स्टेप्सचा शोध लावलाय अशा चर्चा रंगत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नुकतच शहनाज बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये दिसली होती. शहनाजने होस्ट सलमान खानसोबत खूप धमाल मस्ती केली. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी तिने शेअर केल्या.

महत्वाच्या बातम्या:

 

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!