Share

UP Results 2022 : ‘सपा’चे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ मागणी

Published On: 

उत्तर प्रदेश : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मतमोजणीच्या पूर्वसंध्येला समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला मतमोजणीचे लाइव्ह वेबकास्टींग करण्याची मागणी केली होती.

यासंदर्भात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नरेश उत्तम पटेल (Uttam Patel) यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले असून त्यांनी १० मार्चला होणाऱ्या मतमोजणीदरम्यान मतमोजणी केंद्रांवरुन वेबकास्टींग करण्याची आणि या वेबकास्टींगची लिंक सर्व राजकीय पक्षांना देण्याची मागणी केली आहे. तसेच यामुळे मतमोजणी पादर्शक, स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडेल, असेही म्हणण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी वाराणसीमधील ईव्हीएम मशीन्सची जागा बदलण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपवर निवडणुकीच्या मतमोजणीत गडबड करण्याचा आरोप केला होता. याला अनुसरून पुन्हा एकदा सपाने या वेबकास्टींगची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!