मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतीची पाहणी आणि शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भात पाहणी दौऱ्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर गेले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर फडणवीसांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
लखीमपूर प्रकरणी उत्तरप्रदेश सरकार कारवाई करेलच. पण, महाराष्ट्रातील शेतकर्यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी, पुराने नुकसान झालेल्या राज्यातील आक्रोशित शेतकर्यांचा अधिक विचार राज्य सरकारने करावा, तरच त्यांना दिलासा मिळेल, असं म्हणत पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
लखिमपूरप्रकरणी उत्तरप्रदेश सरकार कारवाई करेलच. पण, महाराष्ट्रातील शेतकर्यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी, पुराने नुकसान झालेल्या राज्यातील आक्रोशित शेतकर्यांचा अधिक विचार राज्य सरकारने करावा, तरच त्यांना दिलासा मिळेल.https://t.co/mlIA1Ymcsx pic.twitter.com/vFf5K23tnf
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 6, 2021
माझी राज्य सरकारला विनंती आहे की, शेतकर्यांप्रती नक्राश्रू ढाळू नका. कुठल्याही दुर्दैवी घटनेपेक्षा त्यावरील राजकारण हे अधिक दुर्दैवी असते. एनसीबीचे नाव काढले की नवाब मलिकांच्या पोटात का दुखते? त्यांचे दुखणे सर्वांना माहिती आहे, मला त्या जखमेवरील खपली काढायची नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
माझी राज्य सरकारला विनंती आहे की, शेतकर्यांप्रती नक्राश्रू ढाळू नका. कुठल्याही दुर्दैवी घटनेपेक्षा त्यावरील राजकारण हे अधिक दुर्दैवी असते. एनसीबीचे नाव काढले की नवाब मलिकांच्या पोटात का दुखते? त्यांचे दुखणे सर्वांना माहिती आहे, मला त्या जखमेवरील खपली काढायची नाही.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 6, 2021
महत्वाच्या बातम्या
- जनतेने आम्हाला समाधानकारक निकाल दिलाय- अजित पवार
- ‘महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास वाढतोय, मुंबई महापालिकेवर एकत्र लढण्याचा विचार’
- देश अंधारात बुडण्याची भीती, केंद्राने वेळीच पावलं उचलली असती तर…; सामनातून केंद्रावर निशाणा
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

