Share

जनतेने आम्हाला समाधानकारक निकाल दिलाय- अजित पवार

Published On: 

मुंबई : राज्यातील मंदिरे कोरोनाच्या संकटामुळे बंद होती. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आणि कोरोनाचे नियम लक्षात घेता आ राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

कोरोनाचे संकट गेले दिड वर्षे आहे. आम्हांला नायलाजात्सव मंदिरं बंद ठेवावी लागली होती. कारण जिथं श्रध्दा असते तिथं भाविक मोठया संख्येने जात असतात. कोरोनाच्या दुसरी लाटेनंतर सर्वांचं म्हणणं होतं की आता मंदिरं खुली करायला हवीत. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजपासून सर्व मंदिरं उघडण्यात अली आहेत. गर्दी होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो होतो. आमचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो.  आशिर्वाद मागितले आहेत की लवकरात लवकर कोरोना जावो. आता खुप महत्त्वाचे सण येत आहेत अशा काळात कोरोनाशी संबंधित नियम पाळावेत अशी सर्वांना विनंती आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

जनतेने देखील आम्हाला समाधानकारक निकाल दिला आहे. कालच्या निवडणूकीच्या निकालात आम्ही सर्वत्र एकत्र लढलो नसलो तरी आम्हांला चांगलं यश मिळालं. आमची तिघांची मत एकत्र केली तर तो आकडा मोठा होतो आहे. आम्ही स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला होता. जनतेने देखील आम्हाला समाधानकारक निकाल दिला आहे. ही काय मोघलाई लागून गेली आहे का?काल महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांची बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांना ज्याप्रकारे चिरडण्यात आलं त्याचा निषेध करण्यात आला, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मागील काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो. परंतु तरीदेखील तसं होताना दिसत नाही. थेट शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न होतो. ही काय मोघलाई लागून गेली आहे का? आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्यावर कारवाई व्हायला हवी. त्याकरिता 11 तारखेला आम्ही संप करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

तब्बल दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या परवानगीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून भाविकांसाठी मुंबईसह राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी पहाटेच जाऊन मंदिरे खुली करत दर्शन घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!