Share

धारूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका!

Published On: 

🕒 1 min read

बीड: शनिवारी अचानक जिल्ह्याच्य काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. चाक्रीवादाळासह झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील धारूर तालुक्यात  मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेच त्याच सोबत अनेकांचे घरे जमीनदोस्त या अवकाळी पावसामुळे झाले आहेत. नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

धारूर तालुक्यातील आवरगाव, पांगरी, तांदळवाडी, हसनाबाद या गावांसह परिसरात शनिवारी दुपारी चक्रीवादळासह अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. यात मोठ्या प्रमाणात केळी, मोसंबी व अन्य फळांच्या बागांचे, तसेच घरांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसासह चक्रीवादळात आवरगाव येथील पाच घरांचे मोठे नुकसान झाले.

तालुक्यात अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आवरगाव, तांदुळवाडी व परिसरामध्ये अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. आवरगावमध्ये सौदागर नखाते यांच्या घरावर पिंपळाचे झाड मोडून पडले. तसेच सुंदर दिगंबर जगताप यांचे घर वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. अंकुश लोखंडे यांच्या अंगावरती भिंत कोसळली असून ते जखमी झाले आहेत. तर अन्य काहीच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे घरामध्ये पावसाचे पाणी साचले.

विद्युत तारा तुटल्या असून काही ठिकाणी पोल काेसळून पडले आहेत. तर अनेक ठिकाणी चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक झाडे जमिनीवर कोसळली. जनावरांची काही गोठेसुद्धा वाऱ्यामुळे उडून गेलेत. वादळाचा फटका आवरगावसह परिसरातील गावांना बसला आहे. या गावांमध्ये जाऊन प्रशासनाने पंचनामे करावेत व झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!