Share

‘To all the आईs…Happy Mother’s Day’ ; व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्सने दिल्या मातृदिनाच्या खास शुभेच्छा!

Published On: 

मुंबई : दरवर्षी, मे महिन्याच्या दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मातृदिन 9 मे रोजी साजरा केला जात आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे आपण नेहमीच म्हणतो. खरं आहे, आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. अशाच आईसाठी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मातृदिनाच्या या खास दिवशी मुंबई इंडियन्सने खास शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्स नेहमीच अशा हटके पोस्टसाठी ओळखली जाते. यावेळी देखील मुंबई इंडियन्स अशीच एक हटके पोस्ट शेअर केली आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/COpA9AnDYs8/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडीओमध्ये नुकतीच आई झालेली हार्दिक पांड्याची पत्नी आणि मुलगा दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये आई नताशा मुलगा अगस्त्य सोबत खेळताना दिसत आहेत. शिवाय या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या देखील अगस्त्य सोबत खेळताना दिसत आहे. या व्हिडिओसाठी एक सुंदर मराठी गाण्याचा देखील वापर केला आहे. ‘आई मला खेळायला जाऊदे’ या गाण्यासोबत मुंबई इंडियन्सने मराठीत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओ सोबत मुंबई इंडियन्सने कॅपशन दिले आहे, ‘to all the आईs…Happy Mother’s Day ????’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!