🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आज(२८ डिसें.)हे अधिवेशन संपणार आहे. दरम्यान, आजच्या शेवटच्या दिवसाचे औचित्य साधून भाजप नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी कोरोनाच्या तिसरे लाटे संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे.
यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून ते म्हणाले आहेत की,’कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आहे. सुमारे २९९ ठिकाणांच्या रुग्णालयांची बांधकाम अद्याप अपूर्ण असून जवळपास ५०% टक्के रुग्णालयाच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत.’ तसेच अशा इमारतींची बांधणी व दुरुस्ती कधीपर्यंत करणार?, असा सवालही त्यांनी केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आहे. सुमारे 299 ठिकाणांच्या रुग्णालयांची बांधकाम अद्याप अपूर्ण असून जवळपास 50% टक्के रुग्णालयाच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत, (1/2) pic.twitter.com/GSrw4U4NsO
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 28, 2021
दरम्यान, पुढे महिला सुरक्षेविषयी बोलत असतांना दरेकर म्हणाले की,’आज राज्यात महिला अधिकारी, महिला खेळाडू ही सुरक्षित नाही. राज्यात रोज कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालू, अशी वल्गना करणार्या सरकारने काय केले?’, असा सवाल त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- ज्या पक्षाने देशात लोकशाही प्रस्थापित केली त्याचे आम्ही वारस आहोत- राहुल गांधी
- राज्यपालांच्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये- संजय राऊत
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

