नागपूर : राजकारणात महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण ती लपवून त्यामागे तत्वज्ञान उभं करणं हे चुकीचं आहे. भाबडेपणाचा मुखवटा आता उद्धव ठाकरेंनी दूर करावा अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. त्याला सडेतोड उत्तर देताना फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.
मुख्यंमत्री काल म्हणाले की महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगालमध्ये एकही उद्योग टिकत नाही, विरोधात बोलणाऱ्यांना ठार मारलं जातं. मग तीच परिस्थिती त्यांना महाराष्ट्रात निर्माण करायची आहे का? जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निराशा बाहेर आली. राज्यातल्या काही मंत्र्यांना वसुलीचं सॉफ्टवेअर देण्यात आलं आहे. कोणाकडून किती वसुली करायचं याची नोंद त्यामध्ये ठेवली जाते. पंतप्रधान हे यंत्रणांच्या गैरवापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत. जर यंत्रणेचा गैरवापर केला असता तर अर्ध मंत्रिमडळ तुरुंगात गेलं असतं. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी शांत बसणार नाहीत, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचं सोनं लुटलं जायचं, पण काल त्यांना गरळ ओकताना पाहिलं’
- मुख्यमंत्री, ड्रग्ज पेडलरची वकिली करणाऱ्या नवाब मलिकांचं तुम्ही समर्थन करता; भातखळकरांचा गंभीर आरोप
- ‘राज्यांच्या कारभारात केंद्राची लुडबुड नको’, मुख्यमंत्र्यांचे जाहीर आव्हान’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

